मुंबई : टेलिकॉम कंपनी Ideaने आपल्या आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Idea कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी १९७ रुपयांचा प्लान लॉन्च केला त्यानंतर कंपनीने आता नवे प्लान्स लॉन्च केले आहेत.


आयडिया कंपनीने ४४९ रुपये आणि ५२९ रुपयांचे टेरिफ प्लान्स लॉन्च केले आहेत. त्यासोबतच आंध्रप्रदेश आणि तेलंगाना सर्कलमध्ये अनलिमिटेड ओपन मार्केट कॉम्बो प्लान्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत.


अनलिमिटेड कॉल्स


या बदलांनंतर ४९८ रुपयांचा प्लान आता आंध्रप्रदेश आणि तेलंगना सर्कलमधील ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉल्स, नॅशनल रोमिंक कॉल, प्रति दिवस १ जीबी डेटा आणि १०० SMS मिळणार आहेत.


प्लानची वैधता वाढवली


या प्लानची वैधता ७० दिवस होती मात्र, आता ती वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ही वैधता ७७ दिवस झाली आहे.


४४९ रुपये आणि ५२९ रुपयांचे प्लान्स


यासोबतच कंपनीने ४४९ रुपये आणि ५२९ रुपयांचे दोन नवे प्लान्स लॉन्च केले आहेत. ४४९ रुपयांचा प्लान आंध्रप्रदेश आणि तेलंगाना सर्कलमधील ग्राहकांसाठी असणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉईस कॉल्स, नॅशनल रोमिंक कॉल, प्रति दिवस १ जीबी डेटा आणि १०० SMS मिळणार आहेत. या प्लानची वैधता ७० दिवस असणार आहे.


त्याचप्रमाणे ५२९ रुपयांचा प्लान केरळ सर्कलमधील ग्राहकांसाठी असणार आहे. या प्लानची वैधता ८४ दिवस असणार आहे. यामध्ये ग्राहकांना यामध्ये ग्राहकांना वॉईस कॉल्स, प्रति दिवस १ जीबी डेटा आणि १०० SMS मिळणार आहेत. मात्र, वॉईस कॉल प्रति दिवस २५० मिनिटे असणार आहे.