Smartphone Lost Or Stolen Take These Steps Immediately: प्रत्येकाच्या हाती आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. प्रत्येक जण त्याच्या कुवतीनुसार स्मार्टफोन घेतो. काही जण ऐपतीप्रमाणे महागडे फोन वापरतात. स्मार्टफोन (Smartphone) तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. जरासा देखील स्क्रॅच आला तर जीव कासावीस होतो. मग विचार करा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर कसं होत असेल. त्यामुळे भविष्यातील हा धोका लक्षात घेऊन काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फोनमधील युनिक नंबर आपल्याला अशावेळी मदत करू शकतो. आपल्या फोनमध्ये 15 अंकी युनिक IMEI नंबर असतो. आयएमईआय म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर असा त्याचा अर्थ होतो. या नंबरद्वारे आपण लोकेशन ट्रॅक करू शकतो. सिमकार्ड बदललं तरी या नंबरद्वारे फोन शोधू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IMEI नंबर मोबाईलच्या मागे म्हणजेच बॅटरीखाली लिहिलेला असतो. आयएमईआय नंबर कोणीही बदलू शकत नाही. सिम किंवा लोकेशन बंद केले जाऊ शकते, परंतु IMEI क्रमांक बंद केला जाऊ शकत नाही. तुमच्या फोनमधील डेटाचा गैरवापर होऊ नये म्हणून तुम्ही याद्वारे ब्लॉक करू शकता. 


फोन हरवला किंवा चोरीला गेल्यास असा मिळवा


- स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर सर्वात आधी पोलिसात तक्रार करा. याबाबतची एक कॉपी तुमच्या जवळ ठेवा. 


- नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनीकडून ड्युप्लिकेट सिमकार्ड घ्या. कारण IMEI नंबर ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट टाकाल तेव्हा या नंबरवरच रिक्वेस्ट येईल. 


- जेव्हा तुम्ही IMEI नंबर ब्लॉक कराल तेव्हा फोन ट्रॅक करू शकणार नाहीत. पण हा फोन पूर्णपणे युजलेस होईल. त्यामुळे कोणीही गैरफायदा घेऊ शकणार नाही.


Credit Score, CIBIL Score आणि CIBIL Report मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या


- ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp. या लिंकवर आयएमईआय ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट टाका. यासोबतच पोलिसांना रिपोर्ट करा. आयडी प्रूफ, परचेस इन्व्हॉइस आणि इतर कागदपत्रं द्या. 


- तुम्ही टाकलेल्या नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. हा तोच नंबर असावा जो फोन चोरीला किंवा हरवण्यापूर्वी सक्रिय होता.


- तुम्हाला रिक्वेस्ट आयडी दिला जाईल. तुम्हाला पुन्हा कधीही IMEI नंबर अनब्लॉक करण्याची आवश्यकता असल्यास, तुम्ही या आयडीवरून स्थिती तपासू शकता.