मुंबई : JioFiber ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन मनोरंजन योजना आणल्या आहेत. तुम्ही देखील JioFiber चे सदस्य असल्यास, तुम्ही 999+ प्लॅन खरेदी केल्यानंतरच तुम्हाला ओव्हर-द-टॉप (OTT) सबस्क्रिप्शन मिळू शकते. परंतु सर्वसामान्यांना हे परवडेलच असे नाही. ज्यामुळे बहुतांश लोक यापासून वंचीत राहू शकतात. ज्यामुळे आपल्या ग्राहकांना काहीतरी अतिरिक्त देण्यासाठी, JioFiber ने नवीन मनोरंजन योजना लॉन्च केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मध्ये ग्राहकांना 399 आणि रु 699 प्लॅन मिळत आहे, जे वापरकर्त्यांना 30 Mbps आणि 100 Mbps डाउनलोड/अपलोड गती देतात. JioFiber ने एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट प्लस या दोन नवीन योजना लाँच केल्या आहेत. चला तर या दोन्ही योजनांबद्दल जाणून घेऊ या.


JioFiber मनोरंजन योजना


नवीन मनोरंजन योजना 399 रुपये किंवा 699 रुपयांचा प्लॅन देत आहे. तुम्हाला प्रथम यापैकी कोणताही प्लॅन खरेदी करावा लागेल आणि नंतर 100 रुपये प्रति महिना मनोरंजन प्लॅन घ्यावा लागेल. ज्यानंतर वापरकर्त्यांना सहा OTT अॅप्सची सदस्यता मिळेल.


JioFiber एंटरटेनमेंट प्लस प्लॅन


जर तुम्हाला आणखी ऍप्समध्ये प्रवेश हवा असेल तर तुम्ही एंटरटेनमेंट प्लस प्लॅनसह जाऊ शकता, जे दरमहा 200 रुपये एक्ट्रा द्यावे लागतील. जे 14 OTT अॅप्समध्ये ग्राहकांना प्रवेश देते. या 14 अॅप्समध्ये Disney Hotstar, Zee5, Sonyliv, Voot, Sunnxt, Discovery+, Hoichoi, Altbalaji, Eros Now, Lionsgate, ShemarooMe, Universal+, Voot Kids, JioCinema यांचा समावेश आहे.


हे प्लॅन JioFiber पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही प्रीपेड JioFiber ग्राहक असाल, तर तुम्हाला आधी पोस्टपेड ग्राहकात रूपांतरित करावे लागेल. जर तुम्ही कंपनीकडून मनोरंजन योजना खरेदी करत असाल, तर तुम्ही Jio सेट-टॉप बॉक्स (STB) वर देखील ते पाहू शकता.


याशिवाय कंपनीने इतर कोणत्याही प्लॅनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. तुम्हाला अजूनही JioFiber वरील तुमच्या एंट्री-लेव्हल योजना कोणत्याही OTT सबस्क्रिप्शनशिवाय सुरू ठेवायचे असल्यास, तुम्ही तसे करू शकता.