मुंबई : एक काळ होता जिथे लोक कंटाळा येईपर्यंत फेसबुक वापरायचे. आता तसंच काहीसं इन्स्टाग्रामच्याबाबतीत होत आहे. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया सोडून केवळ इन्स्टाग्राम वापरणाऱ्यां युजर्सचं प्रमाण वाढत आहे. अनेक सेलिब्रिटी, खेळाडू देखील आपले सगळे अपडेट्स याच माध्यमातून देतात. सध्या रिल्सचा ट्रेन्डही तुफान वाढला आहे. तुम्हाला जर सतत इन्स्टाग्राम वापरण्याची सवय असेल तर ही आजच बंद करावी लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामचा अति वापर करणं महागात पडू शकतं. तासंतास इन्स्टाग्रामवर स्क्रोल युजर्स स्क्रोल करतात. सोशल मीडियाच्या या व्यसनापासून तरुणांना वाचवण्यासाठी इंस्टाग्रामने एक अप्रतिम फीचर आणलं आहे. ज्यामध्ये युजर्सना एका मर्यादेपेक्षा जास्त इंस्टाग्राम वापरल्यास त्यांना अलर्ट मिळणार आहे.


अॅपचा अतिवापर केल्यास मिळणार अलर्ट


इंस्टाग्रामच्या या नवीन फीचरचे नाव आहे 'टेक अ ब्रेक'. 'टेक अ ब्रेक' मध्ये, लोकांना एका मर्यादेपेक्षा जास्त इंस्टाग्राम वापरल्याबद्दल अलर्ट पाहायला मिळेल. तरुणांना याचं व्यसन लागू न देणं हे आमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. याशिवाय जेवढा वेळ ते या अॅपवर असतील तेवढा वेळ ते कसा चांगला घालवतील याकडे आमचं लक्ष असणार आहे असं विधान फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजर नताशा जोग यांनी केलं आहे. 


हे फीचर नेमकं कसं काम करतं? 


इन्स्टाग्रामवर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर निवडू शकता. यामध्ये यूजर्सना असा पर्याय दिला असेल. तिथे अॅप 10 मिनिटे, 20 मिनिटे किंवा 30 मिनिटे वापरू शकतात. त्यानंतर तुम्हाला अॅपवरून रिमाइंडर मिळेल. त्या रिमांडरनंतर तुम्हाला दीर्घ श्वास घेण्यास, गाणी ऐकण्यासाठी किंवा लिहायला सांगितलं जाऊ शकतं. 


'Take a Break' हे फीचर सर्वात पहिल्यांदा यूएस, यूके, आयर्लंड, कॅनडा, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये लाँच करण्यात आलं आहे. आता जागतिक स्तरावर सर्व देशांमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आलं आहे. टेक अ ब्रेक फीचर सध्या iOS वर उपलब्ध असेल आणि काही आठवड्यांत ते Android वर आणले जाईल.