मुंबई : आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने चहा पुन्हा चर्चेत आला आहे, पण खऱ्या अर्थाने मुंबईत नागौरी चहा सर्वात लोकप्रिय आहे, नागौरी चहा बसून पिण्यात एक चांगला आनंद असतो, नागौरी चहाची टेस्ट काही औरच असते.


नागौरी चहा म्हणजे काय रे भाऊ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नागौरी चहाचे स्टॉल शहरभर वाढत आहेत, एवढंच नाही, महाराष्ट्रात इतर शहरांमध्येही आता नागौरीचे स्टॉल वाढत आहेत. राजस्थानातील नागौर शहरातून मुंबईत दूध डेअरी आणि स्थापत्य कलेत पटाईत असलेले नागौर शहराची आलेली लोकं म्हणजे नागौरी.


नागौरी चहाची वाढती लोकप्रियता


दुधाची डेअरी चालवताना, नागौरींनी चहा देखील देणे सुरू केले, दुधाचे योग्य प्रमाण असल्याने नागौरी चहा टेस्टी आणि सकस वाटतो. तर कधी नागौरी चहा दिसला तर आस्वाद घ्यायला विसरू नका, हेच आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने सांगणं.