मुंबई : २०१६ पासून मुंबईतील मुख्य रेल्वे स्थानकांवर गुगलतर्फे मोफत वायफाय देण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांना या सुविधेचा खूप फायदा होत असल्याचे दिसत येत आहे. दरम्यान मोफत मिळणाऱ्या या सुविधेसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह देशभरातील ४०० मुख्य रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची सुविधा देण्यात येत होती. पण ही सुविधा केवळ प्रायोगिक तत्वावर असणार आहे.


अर्धा तास फ्री 


मोफत वायफाय इच्छुकांना केवळ अर्धा तासच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. कारण ३० मिनिटांसाठीच मोफत वायफाय सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.


यापूढे इंटरनेटचा स्पीड आपोआप कमी होणार असल्याने युजर्सना लाभ घेता येणार नाही. 


१९ रुपये शुल्क 


प्रत्येक स्थानकावर २४ तास फ्री वायफाय सुविधेसाठी १९ रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.