मुंबई : बाईकच्या चाहत्यांसाठी नोव्हेंबर महिना धमाकेदार ठरणार आहे. कारण १५ नोव्हेंबर या दिवशी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा जावा बुलेटच्या नव्या ३ बाईक बाजारात उतरवणार आहे. या सह रॉयल एनफिल्‍ड देखील २ बाईक लॉन्च करणार आहे. येत्या आठवडात या दोन्ही कंपन्या ५ मॅाडेल भारतीय बाजारात घेवून येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे जावाच्या ३ नव्या मॅाडेलमध्ये जावा स्क्रॅबलर, जावा रेट्रो स्‍ट्रीट, जावा कॅफे रेसरचा समावेश आहे. तसेच रॉयल एनफिल्‍डकडून रॉयल एनफिल्‍ड इंटरसेप्‍टर ६५० आणि  कॉन्टिनेंटल जीटी ६५० या मॅाडेलचा समावेश आहे


जावा स्क्रॅबलर


'जावा'च्या पल्ल्यातील ही सर्वात कमी किंमतीतील बाईक असेल. यांची तुलना हिरो एपल्‍स यांसारख्या मॅाडेलशी करण्यात येत आहे. या बाईकचे फोटो नुकतेच काढण्यात आले आहेत. 


यात टॉल हॅण्डलबार, डिस्‍कब्रेकसोबत २९३ सीसी इंजन असेल. कारटोकच्या माहितीनुसार इंजीन २७ बी.एच.पी पॅावर जनरेट करणार. या बाईकची किंमत १.६ लाख रुपयाच्या जवळपास असेल.  


जावा रेट्रो स्‍ट्रीट


जावा रेट्रोची तुलना रॉयल एनफील्‍ड क्‍लासिक ३५० सोबत होणार आहे. महिंद्राची अपेक्षा आहे की, जावा रेट्रो स्‍ट्रीटला मागणी जास्त असेल. ज्या क्लाससाठी बाईक काढण्याची कंपनीची योजना आहे, त्याला युवक खूप पसंत करतील.


जावा रेट्रो स्‍ट्रीटचा इंजन २९३ सीसी आहे. ही एका सिलेंडरवरची फोरस्‍ट्रोक बाईक असेल. याचं इंजीन २७ बीएचपी पॉवर जनरेट करणार आहे. याची किंमत १.६ लाख रुपयाच्या जवळपास असेल.  


जावा कॅफे रेसर


मीडियाच्या अहवाल लक्षात घेतलं, तर जावा कॅफे रेसर कंपनीची दुसरी बाईक असेल. ही बाईक चर्चेत आहे. ही बाईक महाग आहे, कारण ती तेवढी दमदार असेल. यामध्ये देखील कंपनी २९३ सीसी इंजन देत आहे. 


या बाईकच्या आवाजाविषयी म्हटले, तर खूप आकर्षक असणार आहे. माहितीनुसार याची किंमत तब्बल २ लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.


रॉयल एनफिल्‍ड इंटरसेप्‍टर ६५० आणि कॉन्टिनेंटल जीटी ६५०


रॉयल एनफील्‍ड इंटरसेप्‍टर ६५० आणि कॉन्टिनेंटल जीटी ६५० ला अमेरिकी बाजारात लॉन्च केलं आहे. इंटरसेप्‍टर ६५० यासाठी बुकिंग देखील सुरु केली आहे.
कंपनीच्या वार्षिक लॉन्चिंग कार्यक्रमात रॉयल एनफील्ड राइडर मॅनियामध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. 


हा इव्हेन्ट १६ नोव्हेंबरला गोव्यात सुरु होणार आहे. इंटरसेप्‍टर ६५०ला लांबचा प्रवास म्हणून डिझाईन केल आहे. कॉन्टिनेन्टल GT 650 कॅफे एक रेसर बाईक आहे.


कशी असणार फ्यूल टँक


इंटरसेप्टर ६५० मध्ये १३.७ लीटरची फ्यूल टँ आहे. तसेच कॉन्टिनेंटल जीटी 650 मध्ये यापेक्षा थोडा लहान १२.५ लीटरची फ्यूल टाकी दिली आहे. कंपनीने इंटरसेप्टर ८०४ मिमि उंच सीट दिली आहे. तर कॉन्टिनेंटल यामध्ये ७८९ मिमि उंच टँक दिला आहे.


कसा असणार इंजीन


रॉयल एनफील्डच्या इंटरसेप्टर ६५०च्या वजनाचं म्हणालं तर १९८ किलोग्रामच्या जवळपास असेल. तसेच कॉन्टिनेंटल जीटी ६५०च वजन २०२ किलोग्राम असेल. दोन्ही बाईक मध्ये ६४८सीसी,ऑइलकूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन दिलं आहे. 


हे इंजिन ४७ बीपीएच पॅावर आणि ५३ एनएम टॅार्क जेनरेट करते.बाईक मध्ये ६ स्पीड मैन्युअल गियरबॉक्स आणि स्लिपर क्लच दिलं आहे.


किती असणार किंमत 


अमेरिकी ऑटो मार्केटमध्ये रॉयल एनफिल्ड ने इंटरसेप्टर ६५० चा स्टँडर्ड वेरियंटला ५७९९ डॅालर म्हणजे ४.२१ लाख रुपये किंमत असणार आहे. तसेच कॉन्टिनेंटल जीटी ६५० चा स्टँडर्ड  वेरियंट ला ५९९९ डॅालर म्हणजे ४.३६ लाख रुपये किंमत असणार आहे. 


भारतात कॉन्टिनेंन्टल जीटी ६५०ची किंमत ३ लाखच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. तर इंटरसेप्टर ६५०ची किंमत २.७ लाखच्या आसपास असण्याची शक्यता आहे.