नवी दिल्ली:  केवळ १५०० रुपयात जिओचा मोबाईल फोन बाजारात येत असल्याने इतर मोबाइल फोन कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या मोबाईलमध्ये काहीच सुविधा नसल्याने कोणाला याचा जास्त फायदा होणार नाही अशा बातम्याही पसरल्या होत्या. पण हे वृत्त वाचून जिओ मोबाईल घेण्याचा विचार करणाऱ्यांना नक्कीच आनंद होईल.  कारण भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले व्हॉट्सअॅप या फोनमध्ये असणार आहे.


जिओचा स्मार्टफोन मार्केटमधील इतर फोनपेक्षा वेगळा बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणत्याही दुसऱ्या स्वस्त फोनपेक्षा याचे फिचर्स थोडे वेगळे आहेत. या मोबाईलची घोषणा मुकेश अंबानी यांनी केल्यानंतर यावर देशभरात चर्चा सुरु झाल्या. दरम्यान यामध्ये व्हॉट्सअॅप, फेसबुकसारखे नेहमी उपयोगी असणारे फिचर्स नसल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे जिओच्या फोनकडे खुप अपेक्षा ठेवून आलेला ग्राहक मागे वळतोय की काय असे वाटत होते. पण नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार या फोनमध्ये व्हॉट्सअॅप आणण्याचा विचार सुरु आहे. फॅक्टरी डेली मध्ये आलेल्या वृत्तानुसार जिओची व्हॉट्सअॅपसोबत सध्या बोलणी सुरु आहे.


जिओ आणि व्हॉट्सअॅपमिळून जिओ फोनसाठी खास व्हॉट्सअॅप वर्जन आणण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पण सध्या तरी याविषयी सुरुवातीच्या चर्चा सुरु असल्याचे विश्वासू सुत्रांनी सांगितले आहे. आमचे फेसबुकशी संबध आहेत, काही टेक्निकल प्रोब्लेम्स आहेत पण असे एक व्हॉट्सअॅप वर्जन हवे आहे जे जिओफोनमध्ये ठिकठाक काम करु शकेल असेही सांगण्यात येत आहे.


जिओ फोनमधील सध्याची ऑपरेटींग सिस्टिम व्हॉट्सअॅपला सपोर्ट करत नाही. हा फोन KaiOS वर काम करेल जे OS चे छोटे वर्जन आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप जर यामध्ये घ्यायचे असेल तर फोनला टेलर्ड वर्जन आणावे लागेल.


...तर खुप नुकसान होईल


रिलायन्सची टीम या फोनमध्य व्हॉट्सअॅप आणण्यास यशस्वी ठरली तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या फोनची मागणी वाढेल. कारण काही वर्षांतच व्हॉट्सअॅप प्रत्येकाची गरज बनला आहे. तसे न केल्यास या फोनचा तो मायनस पॉईंटही असू शकतो. तस पाहायला गेलं तर जिओने आपले जिओचॅटचे अॅप या फोनमध्ये दिले आहे. पण याचे जास्त युजर्स नाहीएत. त्यामुळे व्हॉट्सअॅप नसेल तर या फोनला खुप नुकसानाला सामोरे जावे लागेल असेही म्हटले जात आहे.