मुंबई: एअरटेल पाठोपाठ आता जिओ ग्राहकांना देखील मोठा दणका बसणार आहे. तुम्ही जर जिओ ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जिओ ग्राहकांना 1 डिसेंबरपासून जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. एअरटेल पाठोपाठ जिओनेही आता आपल्या प्लॅनचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओच्या ग्राहकांना 1 डिसेंबरपासून आता रिजार्ससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. Airtel, Voda Idea नंतर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओनेही ग्राहकांना धक्का दिला आहे. जिओने प्रीपेड रिचार्जच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 


एअरटेलने यापूर्वीही प्रीपेड रिचार्जच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. एअरटेलचे नवे दरही २६ नोव्हेंबरपासून लागू झाले. जिओनेही आपल्या टेरिफ प्लॅनचे दर वाढवले. जिओने रविवारी नवीन अनलिमिटेड प्लॅन जाहीर केला. 


हे प्रीपेड प्लॅन 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. किंमत वाढली असली तरी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारेच हे प्लॅन असल्याचा जिओ कंपनीने दावा केला आहे. 


जिओने आपल्या प्लॅनमध्ये 31 रुपयांवरून 480 रुपयांपर्यंत वाढवले आहेत. JioPhone साठी खास आणलेल्या जुन्या 75 रुपयांच्या प्लॅन जर कोणी वापरत असेल तर आता 91 रुपये त्यासाठी मोजावे लागणार आहेत. 


129 रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन आता 155 रुपये करण्यात आला आहे. महिन्याच्या प्लॅनपेक्षा जास्त वर्षभराच्या प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आहे.  2399 रुपयांचा एक वर्षाचा प्लॅन आता 2879 रुपयांना मिळणार आहे. 



वाढलेल्या रिचार्ज प्लॅनमुळे आता नागरिकांच्या खिशाला 1 डिसेंबरपासून कात्री लागणार आहे. यासोबत अॅड ऑन पॅकमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. वोडाफोन, एअरटेल प्रमाणे जिओसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार