Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त लॅपटॉप, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या
Reliance Jio Laptop: Jio ने आपला कमी किमतीचा लॅपटॉप JioBook लॉन्च केला आहे, जो चांगल्या फिचर्ससह येतो. JioBook आधीच सरकारी ई-मार्केटप्लसद्वारे (GeM) विक्रीसाठी आहे. जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
JioBook launched in India: भारतीय दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या JioBook नावाच्या परवडणाऱ्या लॅपटॉपवर काम करत असल्याच्या बातम्या 2021 च्या सुरुवातीला समोर आल्या. आता कंपनीने गूपचूप लॅपटॉप देशात लॉन्च केला आहे. JioBook आधीच गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लसद्वारे (GeM) विक्रीसाठी आहे आणि दिल्लीतील प्रगती मैदानावर चालू असलेल्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये (IMC 2022)देखील प्रदर्शित केले आहे. चला जाणून घेऊया Reliance JioBook ची किंमत आणि फीचर्स
यांनाच खरेदी करण्याची संधी
JioBook विशेषत: ज्यांना 20 हजारांखालील लॅपटॉप खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी हा कमी बजेटचा लॅपटॉप आहे. सध्या फक्त सरकारी अधिकारीच लॅपटॉप खरेदी करु शकतात. मात्र, लवकरच सर्वसामान्य उपलब्धता होईल.
JioBook Specifications
JioBook मध्ये प्लॅस्टिक बॉडी आहे आणि कीबोर्डवरील Windows सोबत मागील पॅनलमध्ये Jio ब्रँडिंगसह आहे. लॅपटॉपमधील इनबिल्ट 4G LTE सपोर्ट हे अनेक लोकांचे मुख्य आकर्षण आहे. डिव्हाइस 1366×768 च्या रिझोल्यूशनसह 11.6-इंच TN डिस्प्ले दाखवते. लॅपटॉप Qualcomm Snapdragon 665 चिपसेटला सपोर्ट करत आहे जो Adreno 610GPU सह येतो. हे 2GB LPDDR4X RAM सह येत आहे. दरम्यान, रॅम वाढवता येणार नाही. की बोर्डवर 32GB मेमरी आहे. त्याची ऑपरेटिंग सिस्टम JioOS म्हणून सूचीबद्ध आहे.
JioBook Features
याशिवाय, ड्युअल मायक्रोफोनसह ड्युअल स्पीकर सेटअप आणि हेडसेटसाठी टू-इन-वन कॉम्बो पोस्ट आहे. पोस्टबद्दल बोलायचे झाले तर लॅपटॉपमध्ये USB 2.0 पोर्ट, USB 3.0 पोर्ट आणि HDMI पोर्ट आहे. हे Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.0 ला देखील सपोर्ट कत आहे आणि एक microSD कार्ड स्लॉट आहे.
भारतात JioBook ची किंमत
JioBook लॅपटॉपची किंमत 19,500 रुपये आहे आणि त्याची विक्री सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) द्वारे केली जात आहे. सध्या, लॅपटॉप केवळ सरकारी विभागातील कर्मचार्यांसाठीच खरेदीसाठी उपलब्ध आहे, दरम्यान, काही अफवा पसरविण्यात येत आहे की दिवाळीपासून जिओबुक मोठ्या प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते.