नोकियाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, हे आहेत फिचर्स
भारतात विक्रीस असणाऱ्या नोकिया २ ची किंमत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : नोकिया कंपनी तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन बाजारात आणत आहे. नोकीया स्मार्टफोन बनविण्याचे लायसन्स असलेल्या फिनलॅंडच्या कंपनीने हा फोन भारतात आणला आहे.
किंमत जाहीर
भारतात विक्रीस असणाऱ्या नोकिया २ ची किंमत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
देशातील अग्रगण्य रिटेल स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. २४ नोव्हेंबर पासून याची विक्री सुरू होणार आहे.
तीन रंगात
नोकीयाचा हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध असेल. पूर्ण ब्लॅक, पूर्ण व्हाईट आणि कॉपर ब्लॅक या रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे.
ही ऑफर
या स्मार्टफोनसोबत ऑफरचा लाभही घेता येणार आहे. यामध्ये रिलायन्स जिओची ऑफरही असणार आहे. नोकिया २ ग्राहकांना ४५ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.
ग्राहकांना दर महिन्याला ३०९ किंवा त्यापेक्षा जास्त आणि ९ महिने रिचार्ज करणे आवश्यक आहे.
अपघाती विमाची सोयही यामध्ये उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये
५ इंच LTPS एचडी डिस्प्ले (720x1280 पिक्सल).
पूर्ण ब्लॅक, पूर्ण व्हाईट आणि कॉपर ब्लॅक या तीन रंगात
१.३GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१२ प्रोसेसर
१ जीबी रॅम 8 जीबी इंटरनल मेमरी (१२८ जीबीपर्यंत वाढणारी)
अॅण्ड्रॉईड ७.१ अपडेट होणारे वर्जन
कॅमेरा
फ्रंट ८ मेगापिक्सेल कॅमेरा
फ्लॅशसहीत ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा
गुगल सहाय्यक
यामध्ये गुगल सहाय्यक देण्यात आले आहे. यामाध्यमातून आपण फोनला कमांड देऊन तुमचे काम करु शकता.
हा ऑप्शन ग्राहकांच्या पसंतीस पडणारा
कोणाशी स्पर्धा
शाओमी रेडमी ४ ए आणि मोटो सी सारख्या स्मार्टफोनशी तुलना
पोर्टपोलिओनुसार नोकिया 3 च्या खालोखाल गणती
कनेक्टिव्हिटी
नोकिया २ मध्ये ४ जी व्हीएलटीई
वाय-फाय 802.11 बी / जी / एन, ब्लूटूथ v4.1
जीपीएस / ए-जीपीएस, एफएम रेडिओ
मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक
किंमत
नोकिया २ हा स्मार्टफोन ६,२९९ रुपयांना उपलब्ध असेल.