Google Pay ने करा हजारोंची कमाई; अनेकांसाठी ठरतोय पार्ट टाईम बिझनेस
देशात गेल्या काही वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये भरमसाठ वाढ झालीय.
मुंबई : देशात गेल्या काही वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये भरमसाठ वाढ झालीय. यात अनेक लोक गुगल पे द्वारे पेमेंट करण्यास जास्त प्राधान्य देतात. मात्र गुगल पे निव्वळ एक ट्रान्झॅक्शन मॉडेल नाही तर एक बिझनेस मॉडेल देखील आहे. या मॉडेलद्वारे नागरीकांना घरबसल्या कमाई करता येणार आहे. नेमकं हे मॉडेल कसं असणार आहे, हे जाणून घेणार आहोत.
देशातील असंख्य ट्रान्झॅक्शन आता Google Pay द्वारेच होतात. याच गुगल पे द्वारे आता मोबाईल रिचार्ज करूनही कमाई करता येणार आहे. Google Pay वापरकर्त्यांना कमाईची संधी देखील देत आहे. पण यातून कमाई करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
तुम्ही Google Pay वापरून रिचार्ज करता तेव्हा, कंपनीला त्या बदल्यात नेटवर्क असलेल्या कंपनीला कमिशन मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही Google Pay वापरून Jio चे कोणतेही रिचार्ज केल्यास, त्याऐवजी Jio Google Pay ला कमिशन देईल. आता गुगल पे दुकानदारांना व्यवसायाचा पर्याय देत आहे. म्हणजेच जर दुकानदारांनी गुगल पे वापरून लोकांचे मोबाईल रिचार्ज केले तर कमिशनचा काही भाग त्यांनाही दिला जाईल.
गुगल पेची बाजारपेठ आधीच मोठी आहे. एका अहवालानुसार, UPI मार्केटचा 40% भाग Google Pay ने व्यापला आहे. म्हणजेच दैनंदिन UPI व्यवहारापैकी ४०% व्यवहार Google Pay द्वारे केले जातात. वास्तविक Google Pay हे ब्रोकर अॅप आहे जे अगदी ब्रोकरसारखेच काम करते. त्याचा संपूर्ण नफा कमिशनवर अवलंबून असतो. त्यामूळे तूम्ही गुगल पे बिझनेस घेतल्यास, तुम्हाला कमिशनचा काही भाग देखील मिळू शकतो, आणि तूम्हीही कमाई करू शकता.