Maruti Suzuki ला एक चूक भोवली! 17 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या
Maruti Suzuki Recall Vehicles: मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. वाढती मागणी पाहता मारुतिने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एसयूव्ही सादर केली आहे. मात्र असं असताना कंपनीने ग्राहकांना विकलेल्या 17 हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
Maruti Suzuki Recall Vehicles: मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशभरात मोठी मागणी आहे. वाढती मागणी पाहता मारुतिने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एसयूव्ही सादर केली आहे. मात्र असं असताना कंपनीने ग्राहकांना विकलेल्या 17 हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाड्यातील सुरक्षामानकांचा आढावा घेतल्यानंतर कंपनीला ही चूक लक्षात आली आहे. त्यानंतर कंपनीने मोठ्या संख्येने गाड्या परत मागवल्या आहेत. मारुति सुझुकीने बुधवारी सांगितलं की, ऑल्टो के 10, ब्रेझा आणि बलेनो मॉडेलच्या एकूण 17,362 गाड्यांमध्ये ही समस्या दिसली आहे. त्यानंतर कंपनीने एअरबॅग तपासणी आणि बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. परत मागवलेल्या गाड्यांमध्ये ऑल्टो के 10, एस-प्रेसो, ईको, ब्रेझा, बलेनो आणि ग्रँड विटारा या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची निर्मिती 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान केली होती.
कंपनीने सांगितलं की, "गाड्यांची योग्य ती तपासणी केली जाईल. एखादी समस्या दिसल्यास कोणतेही शुल्क न आकारात एअरबॅग बदलली जाईल. आम्हाला शंका आहे की, काहीतरी चूक झाली आहे. त्यामुळे दुर्घटना झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रेटेंसर व्यवस्थितरित्या काम करेल की नाही याबाबत शंका आहे."
वाहनधारकांना कंपनीने सूचना दिली असून जवळच्या अधिकृत वर्कशॉपमध्ये संपर्क साधण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी या काळात घेतलेली वाहनं काळजीपूर्वक चालवण्याची सूचना देखील केली आहे.
बातमी वाचा- Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...
दुसरीकडे, मारुति सुझुकी कंपनीने 2022 या वर्षात 3.2 लाख गाड्यांचं वितरण भारतीय रेल्वेमार्फत केलं आहे. आतापर्यंतचं मोठ्या प्रमाणात वितरण आहे. यामुळे 1800 मेट्रिक टन कार्बनडायऑस्काईडचं उत्सर्जन रोखलं आहे. त्याचबरोबर 50 मिलियन लिटर इंधानाचीही बचत केली आहे. रेल्वेचा प्रभावी वापर केल्याने कंपनीने 45,000 ट्रक ट्रिप वाचल्या आहेत. यासाठी कंपनीने भारतीय रेल्वेचे आभार मानले आहेत.