मुंबई : फेसबूकने 'मॅसेंजर' अॅपमध्ये आजपासून नवीन फिचर्स लॉन्च केले आहे. हे फिचर्स फेसबूकच्या व्हिडिओ कॉलिंगमध्ये दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉलिंग करणाऱ्या युजर्सना आकर्षक पद्धतीने कॉलिंग करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फिचर्सच्याद्वारे व्हिडिओ कॉलिंग दरम्यान अॅनिमेटेड हावभाव करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्टसही त्यामध्ये अॅड करू शकता. वैयक्तिक किंवा ग्रुप व्हिडिओ कॉलिंग दरम्यान तुम्हाला स्क्रिनशॉटही घेता येणार आहे. स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामप्रमाणे या अॅपमध्ये फिल्टर्सही अॅड केले आहे.  


स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम या अॅप्सनी आपल्या युजर्सना दिलेल्या 'फिल्टर्स' फिचर्सला टक्कर देण्यासाठी व्हिडिओ कॉलिंगमध्ये आकर्षक फिचर्स अॅड करून फेसबुकने आपल्या मॅसेंजर अॅपद्वारे युजर्सचे लक्ष आकर्षित करत आहे.