मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि बाजारपेठेतील मागणीनंतर आता अॅपल आपला आयफोन यूएसबी टाइप-सी पोर्टसह लॉन्च करणार असल्याचे वृत्त आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की नवीन आयफोनमध्ये यूएसबी टाइप-सी मिळेल, जो 2023 मध्ये लॉन्च होईल. सध्या MacBook आणि iPad चे काही मॉडेल Type-C पोर्टसह येत आहेत. अॅपलच्या आयफोनमध्ये लाइटनिंग पोर्ट उपलब्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की Apple यूएसबी टाइप-सी पोर्टसह नवीन आयफोनची चाचणी  करत आहे. या वर्षी लॉन्च होणाऱ्या आयफोनमध्ये लाइटनिंग पोर्ट उपलब्ध असेल. परंतु त्यानंतर, आयफोन 15 टाइप-सी पोर्टसह ऑफर केला जाईल. परंतू Apple ने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही.


सध्या, iPad Pro, iPad Air आणि iPad Mini USB Type-C पोर्टसह उपलब्ध आहेत.  युरोपियन युनियन अनेक दिवसांपासून युनिव्हर्सल चार्जरची मागणी करत आहे. सर्व गॅजेट्स चार्ज करण्यासाठी एकाच प्रकारचे चार्जर वापरावे, असे युनियनचे म्हणणे आहे. यामुळे युजर्सना सोपे होणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातही घट होणार आहे.


Apple चे प्रसिद्ध ऍनालिस्ट मिंग-ची कुओ यांनी देखील दावा केला की, 2023 मध्ये Apple आयफोन 15 मॉडेल टाइप-सी पोर्टसह लॉन्च करेल. Apple ने पहिल्यांदा 2012 मध्ये लाइटनिंग पोर्ट आयफोन 5 सह सादर केले होते. त्यानंतर 2016 मध्ये मॅकबुक प्रो मध्ये टाइप-सी सपोर्ट देण्यात आला.


Apple सध्या iPhone 14 सीरिजवर काम करत आहे. या सीरीज अंतर्गत, iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.