मुंबई : ग्राहकांना कमी किंमतीत स्वस्त डेटा प्लान देण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्यांची स्पर्धा सुरू आहे. बीएसएनएल (BSNL) देखील या स्पर्धेत मागे राहिली नाही. त्यांनी स्पर्धेत उतर नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने 'डेटा त्सुनामी' प्लान आणलाय. याआधी बीएसएनएलने ११८ रुपयांचा रिचार्ज प्लान आणला होता. ज्यामध्ये २८ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा मिळतोय. तर ९८ रुपयांच्या पॅकमध्ये २.५१ रुपये प्रती जीबी डेटा मिळतोय.


काय प्लान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज १.५ जीबी डेटा मिळणार 
९८ रुपयांच्या पॅकमध्ये २८ दिवसांची वैधता 
बीएसएनएलच्या सर्व सर्कलला लागू


जियोपेक्षाही स्वस्त 


 १४९ रुपयांच्या जियो ऑफरमध्ये २८ दिवसांसाठी रोज १.५ जीबी डेटा मिळतोय. त्याहिशोबाने एक जीबी डेटाची किंमत ३.५ रुपये पडते. 


एअरटेलही मागे 


एअरटेलदेखील १४९ रुपयांची ऑफर देतेय. ज्यामध्ये ५.३ रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळतो.