Oppo Find X2 सीरीज भारतात लॉन्च होणार; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
जाणून घ्या Oppo Find X2 सीरीजची किंमत आणि फिचर्स...
नवी दिल्ली : Oppo Find X2 सीरीज भारतात लॉन्च होणार आहे. कंपनी या सीरीजचे दोन स्मार्टफोन Oppo Find X2 आणि Oppo Find X2 Pro लॉन्च करणार आहे. भारताआधी हे दोन्ही स्मार्टफोन युरोपमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. 17 जून रोजी दुपारी 4 वाजता ओप्पोच्या या दोन्ही सीरीजचं लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे लॉन्चिंग होणार आहे. लाईव्ह स्ट्रिमिंग कंपनीच्या यूट्यूब चॅनेल आणि Oppo Mobiles Indiaच्या सोशल मीडियावरुन पाहता येऊ शकतं.
Oppo Find X2 सीरीज 120Hz अल्ट्रा व्हर्जन डिस्प्ले आणि पंच होल डिस्पले डिजाइनसह लॉन्च होणार आहे. Oppo Find X2 Pro या सीरीजचं सर्वात प्रीमियम मॉडेल आहे, जो 10x हाइब्रिड झूम आणि 60x डिजिटल झूमसह लॉन्च करण्यात येणार आहे.
भारतात Oppo Find X2च्या 12GB + 256GB वेरिएंटची किंमत 60 हजार ते 65 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
काय आहेत Oppo Find X2चे फिचर्स -
- 6.7 इंची AMOLED पॅनेल
- रेज्यूलेशन QHD+ आणि रिफ्रेश रेट 120Hz
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर
- 4200 एमएएच बॅटरी
- 65W SuperVOOC 2.0 फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग
- या फोनमध्ये 3.5 mm ऑडिओ जॅक देण्यात आलेला नाही
- Wi-Fi 6, Bluetooth 5.1
- ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल Sony IMX 586 सेंसर
12 मेगापिक्सल सेकेंडरी Sony IMX708 सेंसर
13 मेगापिक्सल तिसरा सेंसर
फ्रन्ट कॅमेरा 32 मेगापिक्सल
Oppo Find X2 Pro फिचर्स -
- 6.7 इंची क्यूएचडी अल्ट्रा डिस्प्ले
- ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर
- 4260 एमएएच बॅटरी
- 65W SuperVOOC 2.0 फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी
- ऍन्ड्रॉइड 10वर आधारित कलरओएस 7.1
- ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप -
- 48 मेगापिक्सल प्रायमरी सोनी IMX 689 सेंसर
- 48 मेगापिक्सल सेंसर
- 13 मेगापिक्सल टेलीफोटो लेंस
- 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेंसर