नवी दिल्ली:  पेटीएमने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीतर्फे ग्राहकांना दोन लाखापर्यंत विमा कव्हरेज दिले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेटीएमए पेमेंट्स बँकेत खाते उघडणाऱ्या सर्व ग्राहकांना डिजिटल डेबिट कार्ड दिले जाणार आहे. या पेटीएम ग्राहकांना पीव्हीबी खातेधारक होण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.  यानंतर त्यांना मोफत डिजिटल कार्ड दिले जाईल.


दोन लाखांचा विमा


 "डेबिट कार्ड डिजिटलमुळे  ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या आमच्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे पीपीबीचे एम.डी रेणु सत्ती यांनी सांगितले.


पेटीएमची भागीदारी


पेटीएम पेमेंट्स बॅंक (पीपीबी) ने नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) बरोबर मूल्य-आधारित डिजिटल डेबिट कार्ड आणण्यासाठी भागीदारी केली आहे. पीपीबी डिजिटल डेबिट कार्डद्वारे जे ग्राहक क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वीकारतात त्या सर्व व्यापार्यांना पैसे देण्यास सक्षम असतील. हे Pettym ग्राहकांना देखील ऑनलाइन पैसे भरता येणार आहेत.