POCO चा 50MP आणि 5000mAh बॅटरी असलेला 5G स्मार्टफोन फक्त 999 रुपयात, जाणून घ्या कसं ते
POCO M4 5G Smartphone: गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. बाजारात एकापेक्षा एक सरस फोन येत आहेत. नवं 5G नेटवर्कचं मार्केट पाहता आता कंपन्यांनी स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. जर तुम्ही मिड रेंज असलेला उत्तम दर्जाचा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
POCO M4 5G Smartphone: गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. बाजारात एकापेक्षा एक सरस फोन येत आहेत. नवं 5G नेटवर्कचं मार्केट पाहता आता कंपन्यांनी स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. जर तुम्ही मिड रेंज असलेला उत्तम दर्जाचा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नुकतंच POCO कंपनीने M4 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवर एका ऑफरमध्ये तुम्हाला Poco M4 Pro 5G या स्मार्टफोनसाठी फक्त 999 रुपये मोजावे लागणार आहेत.
POCO M4 5G वर काय ऑफर आहे?
फ्लिपकार्टवर Poco M4 5G च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,999 रुपये आहे. फ्लिपकार्टवर या फोनवर 18 टक्के सवलतीसह 12,999 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र इतर डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर पाहता हा फोन फक्त 999 रुपयांना मिळणार आहे. अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तुम्ही एक्स्चेंज ऑफरसह फोनच्या खरेदीवर रु. 12,000 पर्यंत बचत करू शकता. एक्सचेंज ऑफरचा फायदा जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून आहे. एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅकसह, फोन 999 रुपयांना मिळू शकतो.
बातमी वाचा- WhatsApp मधून चुकून Video किंवा Photo डिलीट झालाय! असं कराल रिस्टोर
काय आहेत फीचर्स
Poco M4 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेली 6.6 इंचची स्क्रीन आहे. या डिव्हाइसमध्ये Full HD+ LCD डिस्प्ले पॅनल आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट आहे. हा फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो आणि ते म्हणजे 4GB RAM + 64GB, 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 128GB हे आहेत. Poco M4 Pro 5G मध्ये 8MP अल्ट्रावाइड कॅमेरासोबतच 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनच्या समोरील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco M4 Pro 5G मध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे, जी MIUI 12.5 यूजर इंटरफेसवर काम करते.