मुंबई : Realme Smartphone : Realme लवकरच भारतात जबरदस्त बॅटरी असलेला टॅबलेट लॉन्च करणार आहे. Realme Pad X असे नव्या फोनचे नाव आहे. एका अहवालात टॅबलेटच्या भारतीय आवृत्तीची लॉन्चबाबत सांगण्यात आले आहे. टाइमलाइन, रंग आणि स्टोरेज पर्याय याची माहिती लिक झाली आहे. अधिक जाणून घ्या Realme Pad X चे अप्रतिम फीचर्स... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Realme ने गेल्या आठवड्यात चायना बाजारपेठेत Realme Pad X नावाचा एक नवीन टॅबलेट लॉन्च केला. टॅबलेटला नंतर भारतात लाँच करण्याबाबत टीझ करण्यात आले आहे. मात्र, याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. आता 91mobiles च्या अहवालात टॅबलेटच्या भारतीय आवृत्तीसाठी लॉन्च टाइमलाइन, रंग आणि स्टोरेज पर्याय याची माहिती पुढे आली आहेत.  


Realme Pad X कधी येणार बाजारात?


रिपोर्टनुसार, Realme Pad X जूनच्या पहिल्या सहामाहीत भारतात लॉन्च होईल. हा टॅब ग्लेशियर ब्लू, रेसिंग ग्रीन आणि ग्लोइंग ग्रे या तीन कलर व्हेरियंटमध्ये येईल. स्टोरेज पर्यायांबाबत बोलायचे झाले तर Realme टॅबलेटला दोन कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर करेल: 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आणि 6GB RAM आणि 128GB स्टोरेज.


Realme Pad X Specifications


Pad X 11-इंचाच्या एलसीडी डिस्प्लेसह 2K रिझोल्यूशन या मोबाईलमध्ये असणार आहे. पॅनेल 450 निट्स पीक ब्राइटनेस, DC डिमिंग आणि 16.7 दशलक्ष रंगांमध्ये सक्षम आहे. टॅब स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटद्वारे काम करणार आहे जो Adreno 619 GPU सह जोडलेला आहे.


Realme Pad X Features


हा टॅबलेट 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येईल. टॅबलेट कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय आणि ब्लूटूथ असेल. तो Android 12 वर आधारित पॅडसाठी Realme यूआय 3.0 बूट करतो.


Realme Pad X कॅमेरा आणि बॅटरी


Pad Xमध्ये 13-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल 105° फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे. यात 33W फास्ट चार्जिंगसह 8,340mAh बॅटरी आहे आणि स्टायलस सपोर्ट आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये डॉल्बी अॅटमॉस आणि हाय-रेझ ऑडिओसह क्वाड-स्पीकर सेटअप आणि पीसी कनेक्ट, स्प्लिट-व्ह्यू आणि ऍपलच्या सेंटर स्टेज सारखी फ्रंट कॅमेरा कार्यक्षमता समाविष्ट आहे.