नवी दिल्ली : नवीन वर्ष स्वागताच्या जल्लोषात रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी धमाकेदार प्लॅन्स घेऊन आले आहेत. हॅपी न्यू ईयर ऑफर २०१८ च्या अंतर्गत दोन प्लॅन लॉन्च करण्यात आले आहे. यात पहिला प्लॅन १९९ रूपयांचा तर दुसरा २९९ रुपयांचा आहे. हे दोन्ही प्लॅन्स प्राईम मेंबर्ससाठी असून महिन्याभरासाठी आहेत. हे प्लॅन्स घेतल्यास जिओच्या सर्व अॅप वापरण्याची सुविधा मिळेल.


१९९ रूपयांचा प्लॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये युजर्स २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल आणि SMS ची सुविधा देण्यात आली आहे. दररोज १.२ जीबी 4G डेटा मिळेल. म्हणजेच एकूण 3.6GB डेटा मिळेल. लिमीट संपल्यानंतरही ग्राहकांना डेटा मिळत राहील. त्याचा स्पीड कमी नाही होणार. 


२९९ रूपयांचा प्लॅन


कंपनीने महिन्याला जास्त डेटा वापरणाऱ्यांसाठी २९९ रुपयांचा प्लॅन सादर केला आहे. यात २८ दिवसांसाठी रोज  2 जीबी 4G डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉल आणि SMS ची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये 2 जीबी संपल्यानंतरही कमी स्पीडमध्ये युजर्संना डेटा मिळेल. सध्या हा प्लॅन कंपनीच्या वेबसाईटवर अपडेट करण्यात आला नसला तरू त्याची माहिती लवकरच देण्यात येईल.