TREZOR सोबत रिनॉल्टची धमाकेदार एन्ट्री, फीचर्स वाचून व्हाल हैराण
फ्रेंच कार निर्माता कंपनी रिनॉल्टने बुधवारी ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्या दिवशी ट्रेजर (TREZOR) ही कार सर्वांसमोर आणली.
नवी दिल्ली : फ्रेंच कार निर्माता कंपनी रिनॉल्टने बुधवारी ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्या दिवशी ट्रेजर (TREZOR) ही कार सर्वांसमोर आणली. रेनोकडून सादर करण्यात आलेली ही कार कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक कार आहे. कार डिझाईन करणा-या टीमचे प्रमुख वेन डेन एकर यांनी सांगितले की, कंपनीच्या कारवरून हे स्पष्ट दिसतंय की, येणा-या काळात कंपनी कशा कार्स तयार करणार आहे.
किती आहे डायमेंशन?
रेनोची ट्रेजर ही शानदार कारला जगातल्या अनेक प्रदर्शनांमध्ये मोस्ट ब्युटीफूल कॉन्सेप्टचा किताब मिळाला आहे. ट्रेजर ग्लोबल ऑटो शोमध्ये स्टॉपर सुद्धा आहे. भारतीय बाजारात ही कार सादर केल्यानंतर हे दिसंतय की, कंपनीचा भारतीय बाजारात मोठा ग्रोथ प्लॅन आहे. ट्रेजर कॉन्सेप्ट ४७०० एमएम लांब, १०८० एमएम उंच आणि २१८० एमएम रूंद कार आहे.
आकर्षक आणि दमदार लूक
लांब बोनट आणि टू-सीटर कॅबिन असलेली रेनोची ही कार दिसायला फारच आकर्षक आहे. कंपनीने दावा केलाय की, यूनिक डिझाईनमुळे कारचं वजन १६०० किलो ग्रॅम(१६ क्वींटल) आहे. ट्रेजरच्या फ्रन्ट व्हीलची साईझ २१ इंच आणि रिअर व्हीलची साईझ २२ इंच आहे. इंटेरिअरबाबत सांगायचं तर ट्रेजर कॉन्सेप्ट कारमध्ये लेदरचं डॅशबोर्ड देण्यात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की, ट्रेजरच्या ३५० पीएसची पावर आणि ३८० एनएमचा टार्क जनरेट करतं.
कारमध्ये दोन इलेक्ट्रीक मोटर
कारची इलेक्ट्रीक मोटर दोन वेगवेगळ्या मोटरकडून पॉवर घेते. एक मोटर समोरच्या बाजूस आहे तर दुसरी मागच्या बाजूस. मुख्य बाब म्हणजे दोन्ही बॅटरीमध्ये कुलिंग सिस्टीम देण्यात आलं आहे. कंपनीने दावा केलाय की, रेनोची नवीन इलेक्ट्रीक कार केवळ ४ सेकंदात ० ते १०० किमीच्या वेगाने प्रवास करू शकते.