मुंबई : अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी जेलमध्ये टाकल्यानंतर पाकिस्तानचे नेते आणि क्रिकेटर यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काही पाकिस्तानी नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे असं म्हटलं आहे. मात्र सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण, हे काही नागरिक धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतात, हे देखील सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून दिसून आलं आहे. मात्र सर्वात धक्कादायक प्रतिक्रिया आली आहे ती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी,  ती प्रतिक्रिया अतिशय धक्कादायक आहे, तर सर्वात समतोल प्रतिक्रिया दिली आहे, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने, शोएबने भावना योग्य शब्दात आणि कायद्याचं महत्व देखील योग्य शब्दात व्यक्त केलं आहे. एकंदरीत भारताप्रमाणे पाकिस्तानातही काही फॅन्स नाराज आहेत, तर काही लोकांना हा आनंद आहे की न्याय व्यवस्थेचा दरारा टिकला पाहिजे, कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजेत.


पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची वादग्रस्त प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खानला जेल झाल्याने सर्वात वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणतात, सलमान खानसोबत भेदभाव करण्यात आला आहे, कारण सलमान खान हा भारतात अल्पसंख्याक समुदायात आहे.


पाकिस्तानचा वेगवान बॉलर शोएब अख्तर म्हणतो...


पाकिस्तानचा वेगवान बॉलर शोएब अख्तर, अभिनेता सलमान खानला शिक्षा झाल्याने दु:ख व्यक्त करताना म्हणतो, शोएब अख्तरने लिहिलं आहे, "सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा झाल्याने वाईट वाटतंय."


शोएब अख्तर, पुढे म्हणतो "पण कायदा आपलं काम करणार आणि आम्हाला भारताच्या सन्माननीय कोर्टाच्या आदेशाचा आदर केला पाहिजे. तरीही मला कुठे तरी वाटतं की, सलमान खानला जरा जास्तच कडक शिक्षा झाली आहे. सलमान खान यांचं परिवार आणि फॅन्ससोबत मी आशा व्यक्त करतो, की सलमान खान लवकरच जेलमधून बाहेर येईल."