मुंबई : 'सॅमसंग' (Samsung) आज भारतात पहिला स्मार्टफोन 'सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड' (Samsung Galaxy Fold) लॉन्च करणार आहे. कंपनीचा लॉन्च इव्हेंट दिल्लीत दुपारी १२ वाजता होणार असल्याची माहिती आहे. हा फोन एप्रिल महिन्यात लॉन्च होणार होता. पण फोनच्या फोल्डेबल स्क्रीनमध्ये काही त्रुटी आढळल्याने, एप्रिलमधील लॉन्चिंग रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर फोनमधील त्रुटी दुरुस्त करत, कंपनीने हा फोन ग्लोबली लॉन्च केला. आज 'सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड' भारतात लॉन्च करण्यात येत असल्याचं समजते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सॅमसंग'ने ग्लोबल मार्केटमध्ये 'सॅमसंग गॅलक्सी फोल्ड' १९८० डॉलर इतक्या किंमतीत लॉन्च केला. भारतीय रुपयांत याची किंमत १ लाख ३६ हजार ५०० रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीकडून भारतातही जवळपास याच किंमतीत गॅलक्सी फोल्ड लॉन्च करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.



Samsung Galaxy Fold फिचर्स - 


- ७.३ इंची primary flexible AMOLED डिस्प्ले


- आणखीन एक ४.६ इंची एचडी + सुपर AMOLED सेकंडरी स्क्रिन आहे


- ७ nm क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ ऑक्टाकोर SoC प्रोसेसर (7nm Qualcomm Snapdragon 855 octa-core SoC)


- १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज


- ४,३८० mAh बॅटरी बॅकअप


- रियल ट्रिपल कॅमेरा सेटअप  (१६ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा + दोन १२ मेगापिक्सल सेंसर)


- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १० मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा 


- Wi-Fi, GPS आणि Type-C यासारखे फिचर्स दिले जाऊ शकतात.



'सॅमसंग' पुढील महिन्यात हा स्मार्टफोन आणण्याची शक्यता आहे. परंतु 'सॅमसंग गॅलक्सी फोल्ड' भारतीय बाजारात विक्रीसाठी आणण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रिपोर्टनुसार, 'सॅमसंग इंडिया' वेबसाइटवर Samsung Galaxy Fold लवकरच लिस्ट केला जाण्याची शक्यता आहे.