नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सॅमसंगने आपल्या फोनच्या किंमतीत कपात केली आहे.


स्मार्टफोनच्या किंमतीत कपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅमसंगच्या गॅलेक्सी ऑन मॅक्स या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. हा फोन जुलै २०१७ मध्ये १६,९०० रुपयांत लॉन्च करण्यात आला होता. मात्र, आता या किमतीमध्ये कपात करण्यात आलीय.


इतकी करण्यात आली कपात


सॅमसंगचा गॅलेक्सी ऑन मॅक्स फोन ई-कॉमर्स वेबसाईटवर फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवर ऑर्डर करु शकता. सॅमसंगच्या गॅलेक्सी ऑन मॅक्स फोनच्या किंमतीत ३००० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता १३,९०० रुपयांत उपलब्ध आहे.


१० टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काऊंट


जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचं क्रेडिट कार्ड आहे तर फ्लिपकार्टवरुन फोन खरेदी केल्यास तुम्हाला १० टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काऊंट मिळणार आहे.


सॅमसंग गॅलेक्सी ऑन मॅक्सचे फिचर्स...


या फोनमध्ये ५.७ इंचाचा १०८०X१९२० पिक्सल रिझॉल्युशन असलेला फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. १.६९ गिगाहर्ट्सचा ऑक्टा-कोअर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. इंटरनल मेमरी तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढवू शकता. 


अँड्राइड ७.० नूगा वर चालणारा हा फोन ड्युअल सिम ४जी वीओएलटीई फोन आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रँट आणि रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ३३०० mAhची बॅटरी देण्यात आली आहे.