कधी आहे वैशाख पौर्णिमा? या दिवशी कोणत्या 5 देवांची पूजा करावी?

Vaishakh Purnima 2024 Date : वैशाख पौर्णिमा 22 मे की 23 मे कधी आहे. त्याशिवाय पौर्णिमेला 5 देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा असून ते कोणते देवी देवता आहे जाणून घ्या. वैशाख महिन्याती  पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आणि पीपल पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या तिथीला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. 

May 22, 2024, 13:04 PM IST
1/7

वैशाख महिन्याती  पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा आणि पीपल पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या तिथीला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. 

2/7

हिंदू पंचांगानुसार वैशाख पौर्णिमा तिथी बुधवार 22 मे रोजी संध्याकाळी 6.48 वाजेपासून गुरुवार 23 मे रोजी संध्याकाळी 7.23 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा ही गुरुवार 23 मे रोजी साजरी करणार आहे. 

3/7

पौर्णिमेला भगवान महादेवाचीही पूजा करण्यात येते. महादेवाच्या पूजेने सुख, समृद्धी, सौभाग्य आणि यश प्राप्त होते अशी मान्यता आहे. शिवाय वैशाख पौर्णिमेला शिवलिंगाला दुधाचा अभिषेक करणे शुभ मानले जाते. 

4/7

वैशाख पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी रात्री देवी लक्ष्मीला सुवासिक फुलं अर्पण करा. पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची जन्मतारीख आहे, पौराणिक कथेत सांगण्यात आलंय. त्यांच्या आशीर्वादाने घर धनधान्याने संपन्न असते अशी मान्यता आहे. 

5/7

भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला झाला अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान बुद्धाची पूजा केली जाते. 'ओम मणि पद्मे हम' या मंत्राचा जप केल्याने मोक्ष प्राप्त होतात असे म्हणतात. 

6/7

भगवान विष्णूच्या उपासनेशिवाय पौर्णिमेचे व्रत आणि उपासना अपूर्ण असते. या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्यामुळे पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. 

7/7

वैशाख पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी भरलेला असतो असं म्हणतात. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतात अशी मान्यता आहे. त्याशिवाय चंद्रप्रकाशात राहिल्याने तणाव आणि डोळ्यांचे सर्व आजार दूर होतात. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)