मुंबई : आजकाल आपलं स्मार्टफोनवरच प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे. माणसांपेक्षा स्मार्टफोनसोबत जास्त रमत आहेत. या फोनची बॅटरी डाउन झाली की जीव अस्वस्थ होतो. तुमच्या फोनची बॅटरी सतत उतरते का? तसं होत असेल तर तुमच्या फोनमध्ये असलेले अॅप त्याला जबाबदार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय विश्वास बसणार नाही पण तुम्ही वापरत असलेले अॅप तुमच्या फोनची बॅटरी जास्त खातात. जाणून घेऊया टिंडर ते ट्रेन तिकीट आणि मेसेंजरपर्यंत कोणते 20 अॅप तुमच्या फोनची बॅटरी खातात जाणून घेऊया. तुम्ही यापैकी कोणते अॅप वापरत नसाल तर ते डिलीट करून टाका आणि बॅटरी वाचवा. 


फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्यूब, व्हॉट्सएप आणि लिंक्डइन सारखे अॅप जर तुमच्या फोनमध्ये बॅगराउंडला सुरू असतील तर ते 11 ज्यादा फीचर सुरू ठेवण्याची परवानगी फोनला देतात. उदा. फोटो, वायफाय, लोकेशन आणि मायक्रोफोन त्यामुळे फोनची बॅटरी लवकर उतरते. इन्स्टाग्रामला डार्कमोडचा पर्याय आहे ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी कमी खाल्ली जाऊ शकते. 


एका अहवालातून हे समोर आलं आहे की ऑनलाइन डेटिंग अॅप 15 टक्के बॅटरी खातात. टिंडर, बम्बल आणि  ग्राइंडर टॉप किलर सारखे अॅप जर तुमच्या फोनमध्ये असतील तर आजच डिलीट करा. ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी जास्त चालेल.


अहवालात 100 अॅपचा सामावेश आहे. मात्र त्यापैकी 20 अॅप जास्त बॅटरी खातात हे सिद्ध झालं आहे. या यादीमध्ये फिटबिट, वेरिजोन, ऊबर, स्काइप, फेसबुक, एयरबीएनबी, बीगो लाइव, इंस्टाग्राम, टिंडर, बम्बल, स्नॅपचॅट, व्हॉट्सएप, झूम, यूट्यूब, बुकिंग डॉट कॉम, अमेजन, टेलीग्राम, ग्राइंडर, लाइक आणि लिंक्डइन सारख्या अॅपचा सामावेश आहे.