WhatsApp News : दिवसातील अनेक तास आपल्या हातात मोबाईल असतो. हल्ली मोकळ्या वेळात तुमचा विरंगुळा काय? असा प्रश्न केल्यास अनेकांचंच उत्तर एकसारखं असतं. ते म्हणजे मोबाईलमध्ये डोकावणं, स्क्रोल करणं. कारण मोकळ्या वेळात चित्र काढणं, पुस्तकं वाचणं, काहीतरी लिहिणं या सवयी आणि या आवडीनिवडी आता कालबाह्य झाल्या आहेत. सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाच्या इतका आहारी गेला आहे की, या पिढीच्या भविष्याबाबत विचार करूनही धडकीच भरते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही दिवसभरात किती वेळ मोबाईल वापरता? या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसावं कारणं अनेक असतील. पण, तुम्ही मोबाईलमध्ये सर्वाधिक वेळ कोणतं अॅप वापरता असं विचारलं असता येणारं उत्तर एकच असेल. ते म्हणजे WhatsApp. (WhatsApp वर Good Morning मेसेज पाठवताय? सावध व्हा, नाहीतर अकाऊंटच Block होईल )


जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं हे मेसेजिंग अॅप. इथं एकाच वेळी तुम्ही अनेकांशी संवाद साधू शकता, व्हिडीओ कॉल करु शकता, माहितीची देवाणघेवाणही करु शकता. अशा या अॅपवरून तुम्हाला दिवसाला शेकडो मेसेज येत असतील. या मेसेजबाबत आपण जाणून घेणार आहोत. 


मेसेजेस करणार घात?


तुम्हालाही दररोज गुड मॉर्निंग, गुड नाईट किंवा असे काही मेसेज ब्रॉडकास्ट लिस्ट करत सर्वांना पाठवायची सवय असेल तर ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारण, साधा Good Morning चा मेसेजही तुमचं अकाऊंट बंद पाडण्याच कारणीभूत ठरू शकतो. किंबहुना तुम्ही एकाच पद्धतीचा मेसेज अनेकांना फॉरवर्ड करण्याऱ्यांपैकी असाल, तरीही तुमचं अकाऊंट बंद करण्याची कारवाई केली जाऊ शकते. तुम्ही पाठवलेले मेसेज स्पॅम असल्याचं समजत कंपनी ही कारवाई करते. 


हेसुद्धा वाचा : Mobile Hacked : तुमचा फोन हॅक झालाय का? 'ही' आहेत मोबाईल हॅक होण्याची संकेत, वेळीच सावध व्हा!


 


इतकंच नव्हे, तर जास्तीत जास्त Contacts शेअर केल्यासही अकाऊंट बंद होऊ शकतं. इथंही हाच नियम लागू होतो की तुम्ही WhatsAppवर एकच कृती वारंवार करत आहाात. त्यामुळं तुमच्यावर ही कारवाई होऊ शकते. तेव्हा यापुढे कुणाहाली WhatsApp मेसेज करताना तो फॉरवर्ड करणं टाळाच.