सुजुकी पुढील महिन्यात लॉन्च करणार GSX-S750
बाईकप्रेमींसाठी आणि वेगाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बाईक बनवणारी दिग्गज जापानी कंपनी सुजुकी लवकरच आपली नवी बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या नव्या बाईकचं नाव GSX-S750 स्ट्रीट फायटर असं असणार आहे.
नवी दिल्ली : बाईकप्रेमींसाठी आणि वेगाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बाईक बनवणारी दिग्गज जापानी कंपनी सुजुकी लवकरच आपली नवी बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या नव्या बाईकचं नाव GSX-S750 स्ट्रीट फायटर असं असणार आहे.
ऑटो एक्सपोमध्ये झलक
सुजुकी पुढील महिन्यात GSX-S750 ही बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. या बाईकची पहिली झलक भारतीयांनी गेल्या महिन्यात झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये पाहिली आहे.
बाईक प्रेमींची इच्छा होणार पूर्ण
पहिली झलक पाहिल्यापासूनच ही बाईक कधी लॉन्च होणार याची बाईकप्रेमी वाट पाहत आहेत. आता बाईक प्रेमींची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे.
अद्याप अधिकृत घोषणा नाही
मात्र, सुजुकी कंपनीतर्फे अद्याप ही बाईक कधी लॉन्च करणार आहे याची अधिकृत घोषणा केलेली नाहीये. पण, लवकरच लॉन्चिंगची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
बाईकची किंमत...
या बाईकची निर्मिती सुजुकी भारतात करणार नाहीये. तर, पूर्णपणे आयात करणार असून त्यानंतर भारतात विक्री करणार आहे. या बाईकी किंमत नेमकी किती असणार आहे या संदर्भात अद्याप कंपनीने कुठलीच माहिती दिलेली नाहीये. मात्र, जवळपास ८ लाख रुपयांच्या घरात या बाईकची किंमत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.