नवी दिल्ली : भारताला डिजिटल इंडिया बनवण्यासाठी इंटरनेट सर्वत्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. इंटरनेटचं नवं मॉडल सादर करत टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने मोबाईल कंपन्यांना डेटा ऑफिस प्रोव्हायडर म्हणजेच POD बनवण्याची कल्पना सुचवली आहे.


PCO प्रमाणेच PDO सुरु होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रायने टेलिकॉम बूथ (PCO)प्रमाणेच पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स (PDO) सुरु करण्याची आयडिया दिली आहे. वाय-फाय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जागोजागी PDO लावण्यात येणार आहेत. यामुळे तब्बल ९० टक्क्यांनी इंटरनेट स्वस्त होणार आहे आणि नागरिकांना स्वस्तात वाय-फाय सुविधा मिळेल. 


बॉडबँड सुविधेत भारत पिछाडीवर


TRAI ने पब्लिक वाय-फायचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प देशातील इंटनेट सुविधा वाढविण्यासाठी सादर केला आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत ब्रॉडबँडमध्ये भारत पिछाडीवर आहे. खास करुन ग्रामिण भागांमध्ये ब्रॉडबँड कनेक्टिविटी नाहीये.


अवघ्या २ रुपयांत मिळणार वाय-फाय


यामुळे आता ट्राय लहान कंपन्यांच्या माध्यमातून वाय-फाय कनेक्टिविटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रायच्या मते, PDO मध्ये वाय-फाय सुविधेसाठी युजर्सला केवळ २ रुपये मोजावे लागणार आहेत.


ट्रायने या संदर्भातील एक मॉडल तयार करुन टेलिकॉम विभागाला पाठवलं आहे. यामध्ये सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर्स एका प्लॅटफॉर्मवर येऊन इंटरनेट अॅक्सेस, सर्व्हिसेज, पेमेंट आणि अथाँटिकेशन उपलब्ध करुन देऊ शकतात. ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी सांगितले की, 'डिजिटल इंडिया' चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ब्रॉडबँड इंटरनेट एक महत्वाचा भाग आहे. तसेच वाय-फाय हे सर्वात स्वस्त माध्यम आहे ज्याची किंमत कमी आहे आणि स्पेक्ट्रम फ्री आहे.