मुंबई : महागडे स्मार्टफोन हरवले तर काय ? या भीतीनेच अनेकजण काही फोन घेणं टाळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधीकधी वेंधळेपणात आपण मोबाईल विसरतो किंवा चोर त्यांच्या हातचलाखीने तो लंपास करतो.  अशावेळेस वेळ वाईट होती असं म्हणून आणि पोलिस तक्रार करून शांत बसण्याशिवाय हातात काहीच नसते. 


तुमच्या दुर्देव्याने मोबाईल हरवल्यास  तो ट्रॅक करण्यासाठी काही वेबसाईट्स मदत करतात. याकरिता तुम्हांला केवळ काही वेवसाईट्सवर आईएमईआई क्रमांक  *#06# यावर नोट करावा लागतो. 


हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी खास या वेबसाईट्स करतात मदत 
www.bhartiyamobile.com
www.microlmts.net
www.trackimei.com
www.in.blackberry.com
www.lookout.com


फोनसोबत गूगल अकाऊंट सिंक करा 


एन्ड्रॉईड डिवाईज मॅनेजर किंवा आईओएस म्हणजेच आयफोन हरवल्यास तुम्हांला काही ट्रिक्स मदत करू शकतात. गूगलच्या एंड्रॉयड ऑपरेटिंग सि‍स्‍टम (ओएस) मध्ये इन बिल्ड ट्रॅकर असतो. त्यामुळे इतर अ‍ॅप डाऊनलोड करण्याची शक्यता नसते. याकरिता केवळ ADM ऑन करावे लागते. यामुळे गूगल अकाऊंट सोबत तुमचा फोन लिंक होतो.  


ट्रॅक माय फोन फीचर  


फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्ही ट्रॅक माय फोन फीचरचा वापर करू शकता. हे अ‍ॅप  अ‍ॅन्ड्रॉईड फोनमध्ये घेऊ शकता. यामध्ये जीमेल आयडीचा वापर करून तुम्ही फोन सिंक करू शकता.  


खास टीप्स 


प्रत्येक मोबाईलचा एक खास आईएमईआई क्रमांक असतो.  
फोनवरून #06# डाएल करा. म्हणजे तुम्हांला तुमच्या मोबाईलचा आईएमईआई क्रमांक मिळू शकतो.  
हा क्रमांक एका सुरक्षित ठिकाणी नोट करून ठेवा. फोन हरवल्यास हा क्रमांक मदत करतो. 
आईएमईआई क्रमांकाच्या मदतीने फोन ट्रॅक करता येऊ शकतो.