Vivo Y58 5G Price in India: विवोने भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन वाय सीरिजचा भाग आहे. Vivo Y58 5G कंपनीचं मिड रेंज डिव्हाईस आहे. यामध्ये प्रीमिअम वॉचसारखा कॅमेरा मॉड्यूल दिलं आहे. यामध्ये दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा मिळतो. विवोचा हा स्मार्टफोन IP64 रेटिंगसह येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये ड्युअल सीम सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच Vivo Y58 5G मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या. 


Vivo Y58 5G ची किंमत किती?


विवोने या हँडसेटला फक्त एकच कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केलं आहे. हा स्मार्टफोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येतो. या व्हेरियंटची किंमत 19 हजार 499 रुपये आहे. तुम्ही अधिकृत स्टोअरमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन हा मोबाईल खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन सुंदरवन ग्रीन आणि हिमालयन ब्ल्यू अशा दोन रंगात उपलब्ध आहे. या मोबाईलवर 1500 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळत आहे. तुम्ही हा फोन ईएमआयवर खरेदी करु शकता. 


Vivo Y58 5G मध्ये 6.72 इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनवर 1024 Nits ची पीक ब्राइटनेस मिळतो. यामध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन  8GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो. 


स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने एक्स्पांड करु शकता. हे डिव्हाईस Android 14 वर आधारित FunTouch OS 14 वर काम करतं. यामध्ये 50MP चे मेन लेन्स आणि 2MP चे सेकेंडरी लेन्स असा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रंटला कंपनीने 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. 


सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी त्यात 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यामध्ये ड्युअल सीम सपोर्ट, स्टिरिअओ स्पीकर सेटअप आणि इतर अनेक फिचर्स मिळतात.