Vodafone Idea Tariff Hike: रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रीपेड आणि पोस्ट पेड असे दोन्ही प्लॅन्ससाठी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 4 जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने प्लान्समध्ये 10-21 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळं आता रिचार्ज करणे महाग होणार आहे. (Vodafone tariff hike)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवले होते. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसणार होता. जिओ आणि एअरटेलनंतर आता वोडाफोननेदेखील रिचार्जचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनिमिटेड वॉइस प्लानबद्दल बोलायचे झाल्यास 28 दिवसांसाठी 179 रुपयांचा रिचार्ज प्लानसाठी आता 199 रुपये मोजावे लागणार आहेत. 


असे असतील रिचार्ज प्लान


459 रुपयांचा 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन 509 रुपयांचा झाला आहे. 365 दिवसांसाठी 1799 रुपयांचा प्लॅन 1999 रुपयांचा झाला. 269 ​​आणि 299 रुपयांचा 28 दिवसांचा प्लॅन 299 आणि 349 रुपयांचा झाला आहे. 319 रुपयांचा 1 महिन्याचा प्लॅन 379 रुपयांचा झाला आहे. डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, 19 रुपयांचा प्लॅन 22 रुपयांचा आणि 39 रुपयांचा प्लॅन 48 रुपयांचा झाला आहे. या प्लॅनची ​​वैधता 1 आणि 3 दिवसांची आहे.


पोस्ट-पेड प्लानचे रिचार्ज कसे असतील


पोस्ट-पेड प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, 401,501 रुपयांचे Indivisual Monthly Rental आता 451,551 रुपये झाले आहे. Family Plan Recharge 601, 1001 रुपयांवरून 701, 1201 रुपयांपर्यंत वाढला आहे.


जिओ आणि एअरटेलचे काय आहेत दर?


एअरटेलने टॅरिफमध्ये 10-21 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. नवीन प्लाननुसार, आता 179चा प्लान आता 199 रुपयांत मिळणार आहे. प्रीपेड दर दररोज सरासरी 70 पैशांनी वाढले आहेत. पोस्टपेड योजना 10-20 टक्क्यांनी वाढले आहेत. 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आता 449 रुपयांना मिळणार आहे. वाढलेले दर ३ जुलैपासून लागू होतील. रिलायन्स जिओनेही रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. बुधवारी कंपनीने, याबाबत माहिती दिली आहे. जिओकडून सांगण्यात आले की रिचार्ज प्लॅन 15 ते 25 टक्क्यांनी महाग होणार आहेत. रिलायन्स जिओचे नवीन प्लॅन ३ जुलैपासून लागू होणार आहेत.