मुंबई : देशात सध्या डिजिटस क्रांतीचं वातारवण आहे. ज्याचा फायदा  ग्राहकांना मोठ्य़ा प्रमाणात होणार आहे. डिजिटल क्रांतीमध्ये आता दूरसंचार कंपनी वोडाफोनने त्याच्या ग्राहकांना एक नवीन ऑफर आणली आहे. या अंतर्गत ग्राहकांना मोफत एक वर्ष ऑनलाइन टीव्हीचा आनंद घेता येणार आहे. कंपनीने ही ऑफर रेड पोस्टपेड युजर्ससाठी सुरुवातीला आणली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोडाफोनचे रेड पोस्टपेड युजर्स नेटफ्लिक्स इंडिया या ऑफरच्या फायदा घेऊ शकता. ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना १२९९ किंवा त्याच्या पेक्षा अधिकचा पॅक अॅक्टीवेट करावा लागेल.


वोडाफोन इंडियाचे रेड पोस्टपेड प्लान ३९९ रुपयांपासून २९९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. व्होडाफोन रेड एक पोस्टपेड स्पेशल प्लान आहे ज्यामध्ये ग्राहकांना स्वस्त कॉल, डेटा आणि एसएमएस सेवा मिळते. ही ऑफर तुम्ही नवीन पोस्टपेड कनेक्शन घेऊन ही मिळवू शकता.


कंपनीनुसार वोडाफोनच्या ऑनलाइन स्टोअर किंवा Netflix टाईपकरुन १९९ या नंबरवर मॅसेज पाठवावा. या ऑफरनुसार ग्राहकाला दर महिन्याला ५०० रुपयांचं क्रेडिट दिलं जाईल. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने ही ऑफर आणली आहे.