Whatsapp वरुन चेक करता येतं Bank Balance; जाणून घ्या कशी Activate करावी ही सेवा
Bank Balance Through Whatsapp: सामान्यपणे फक्त चॅटिंगसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात असला तरी अनेक सेवा ही कंपनी युझर्सला पुरवते. यापैकी अनेक सेवांबद्दल लोकांना कल्पना नाही, अशीच एक सेवा म्हणजे पेमेंट्स
Whatsapp Payment Service: आजकाल व्हॉट्सअॅपचा (whatsapp) वापर जवळजवळ सर्वचजण करतात. खास करुन चॅटिंगसाठी या अॅपचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का चॅटिंगशिवायही या अॅपचे अनेक उपयोग आहेत. व्हॉट्सअॅप आपल्या युझर्सला अनेक सेवा पुरवतं. यामधील एक महत्त्वाची सेवा आहे व्हॉट्सअॅप पेमेंट्सची. या माध्यमातून तुम्ही कोणालाही पैसे ट्रान्सफर करण्याबरोबरच आपल्या बँक खात्यावर किती पैसे शिल्लक आहेत (Bank Balance) याबद्दलची माहितीही मिळवू शकता.
व्हॉट्सअॅपच्या अनेक सेवा
व्हॉट्सअॅप आपल्या युझर्सला यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सेवा पुरवतं. म्हणजेच व्हॉट्सअॅप वापरुन तुम्ही तुमच्या बँक खात्यावरुन अन्य व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे पाठवू शकता. तसेच बँकेच्या खात्यावर किती पैसे आहेत हे सुद्धा पाहू शकता. व्हॉट्सअॅप पेमेंटची सेवा कशी अॅक्टीव्हेट करावी (How To Register Whatsapp Payment Service) आणि तिची वापर कसा करावा जाणून घेऊयात...
WhatsApp Payments सेवा कशी अॅक्टीव्हेट करावी?
व्हॉट्सअॅप पेमेंट्स यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केला जातात त्याच अॅप्सप्रमाणे काम करतं. आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप पेमेंट सुरु करण्यासाठी व्हॉट्सअॅप सुरु करा. त्यानंतर स्क्रीनच्या उजवीकडे वरच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर 'पेमेंट' हा पर्याय निवडा. या ठिकाणी 'अॅड पेमेंट मेथड'वर क्लिक करा. त्यानंतर बँक तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करेल. या ठिकाणी तुमच्या समोर बँकाची एक याची येईल. यापैकी तुम्हाला बँक आणि खात्यासंदर्भातील माहिती भरुन 'डन' पर्यायावर क्लिक करावं लागेल. 'डन'वर क्लिक केल्यानंतर तुमचा क्रमांक व्हॉट्सअॅप पेमेंट्सअंतर्गत रजिस्टर होतो.
नक्की वाचा >> Phone Lost or Stolen: फोन चोरीला गेला अथवा हरवल्यास तातडीने करा या 5 गोष्टी
बँक बॅलेन्स कसं तपासावं?
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये किती पैसे आहेत (how to check bank balance through whatsapp) हे तपासता येतं. व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन अधिकच्या पर्यायांवर क्लिक कराव. येथे पेमेंटवर क्लिल करा आणि बँक खात्यावर क्लिक करा. त्यानंतर बॅलेन्स पाहा हा पर्याय निवडला. आपला यूपीआय पिन टाकून क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बँक बॅलेन्सचा आकडा दिसेल.