इथे मिळतंय `फ्री` आयपीएल तिकीट, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय...
युझर्सला सर्वात अगोदर `माय व्होडाफोन` अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागेल
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर टेलिकॉम कंपनी व्होडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर सादर केलीय. ही ऑफर दिल्ली - एनसीआरच्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी असेल... ऑफरनुसार, प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी आयपीएल मॅचचं तिकीट फ्रीमध्ये मिळवण्यासाठी आणि स्टेडियमपर्यंत पोहचण्यासाठी कॅबची सुविधा दिली जातेय. व्होडाफोनकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, 'व्होडाफोन अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स' ऑफरमध्ये ग्राहक याचा फायदा घेऊ शकतात.
कसं मिळवला आयपीएल तिकीट?
यासाठी युझर्सला सर्वात अगोदर 'माय व्होडाफोन' अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागेल. इथं तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. त्यानंतर विजेत्याला आयपीएल मॅचचं तिकीट आणि फिरोजशाह कोटला स्टेडियमपर्यंत फ्री राईड मिळेल. कंपनीनं हा गेम केवळ दिल्ली - एनसीआरच्या पोस्टपेड आणि प्री पेड ग्राहकांसाठी सुरू केलाय.
यापूर्वी, भारती एअरटेलनं आपल्या युझर्ससाठी लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग अॅप एअरटेल टीव्ही ग्राहकांसाठी आयपीएल २०१८ च्या सर्व लाईव्ह मॅचची अनलिमिटेड मोफत स्ट्रिमिंगची सुविधा हॉटस्टारद्वारे सादर केलीय. सोबतच एअरटेलनं हा अनुभव आणखीन चांगला बनवण्यासाठी एअरटेल टीव्ही अॅपचं नवं व्हर्जनही सादर केलंय.