मीरा-भाईंदर महापालिकेत कोट्यवधींचा यूएलसी घोटाळा, नगर रचनाकार दिलीप घेवारेला बेड्या
पाच वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रथमेश तावडे, झी २४ तास, ठाणे | मीरा भाईंदर महापालिकेचे (Mira Bhayandar Municipal Corporation) तत्कालीन नगररचनाकार दिलीप घेवारे यांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. यूएलसी (Urban Land Ceiling) घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले घेवारे हे गेल्या अनेक दिवसांपासून फरार राहून अटकपूर्व जामीन (Pre-arrest bail) मिळविण्याच्या प्रयत्नात होते. (Billions of ULC scam in Mira Bhayander Municipal Corporation police arrest Town planner Dilip Ghewarela)
मीरा भाईंदरमध्ये २००० साली यूएलसी अर्थात कमाल जमीन धारणा कायदा (Urban Land Ceiling and Regulation Act 1976) लागू असतानाही तो लागू नसल्याचे अनेक बोगस दाखले देऊन त्यांनी शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पूर्व येथील सर्व्हे क्र. ६६३ आणि ६६४ या भूखंडावरील गैरव्यवहाराबाबत पाच वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्यातील त्यांचे साथीदार सत्यवान धनेगावे यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र दिलीप घेवारे गेल्या दोन आठवड्यांपासून फरार होता आणि अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.
गुरुवारी त्याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी सत्र न्यायालयात ठेवण्यात आली होती मात्र सुनावणीपूर्वीच त्याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गुजरातमधल्या सुरत परिसरातून अटक केली आहे.आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ जून पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
संबंधित बातम्या :
DeltaPlusVarian | डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने या जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू