मुंबई : आगामी निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत पक्षांतराविषयी बोलणं लोकांनी टाळलंच पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत ठाण्यात म्हणाले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. सर्वांनी अखेरच्या क्षणापर्यंत पक्षांतराच्या बाबतीत बोलणं टाळलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी मांडलं. पक्षांतराविषयीच्या चर्चेवर ते त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांच्याविषयीसुद्धा राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केल. साऱ्या महाराष्ट्राने आदित्य ठाकरे यांना आपलंसं केलं आहे. इतकच नव्हे, तर त्यांच्या नेतृत्वाला मान्यताही दिली आहे. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पक्ष आणि राज्याचं नेतृत्व करण्याची सर्वांची इच्छा असल्यास यात वावगं काहीच नाही, हे राऊत यांनी स्षष्ट केलं. 


दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. किंबहुना पक्षातील काही नेत्यांनी त्यांना उमेदवार म्हणून गणलंही आहे. याविषयीच्याच आपल्या वक्तव्यावर आता अनिल परब यांनी त्यांची भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. 


आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी कोणतीही घोषणा आपण केली नाही. इतकच नव्हे, तर आपल्याला स्वतःचे अधिकार माहीत आहेत असा खुलासा शिवसेना नेते अनिल परब यांनी केला.  मुख्यमंत्र्यांनी माहिती करून घ्यावी की आपण शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहोत असा टोलाही अनिल परब यांनी लगावला. एकंदरच आता संजय राऊत आणि परब यांची वक्तव्य पाहता अधिकृत घोषणांचीच प्रतिक्षा करण्यावाचून गत्यंतर नाही हेच स्पष्ट होत आहे.