मुंबई : नागपूरसह विदर्भात थंडीची वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. आज आणि उद्या गारपीट तसेच पावसाचा इशारा देण्यात आला असून पाऊस आल्यास कडाक्याची थंडीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने संपूर्ण विदर्भात 28 व 29 तारखेला पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूरसह विदर्भात येत्या दिवसात पुन्हा थंडी वाढणार आहे. 



काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व तुरळक मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची अधिक शक्यता आहे. पाऊस आल्यास विदर्भात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे. 


जिल्हा कृषी हवामान केंद्र आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. शेळ्या व मेंढ्यांना मोकळ्या जागेत चरावयास टाळावे. 


परिपक्व अवस्थेतील पिकांची काढणी केली असल्यास पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीने झाकून ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.