नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी 16 जागा जिल्हापरिषदेच्या तर पंचायत समितींच्या 31 जागावर मतमोजणी पार पडणार आहे. दुपारी 11 वाजेपर्यंत निकालाचे कल स्पष्ट होऊ शकतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय चुरशीची लढत या मतमोजणीमध्ये पाहायला मिळणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती.


पोटनिवडणुकीच्या जागा जिंकून एकहाती सत्ता राखण्याचा  कॉंग्रेस प्रयत्न करणार आहे. 


तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख निवडणुकीच्या प्रचारात नव्हते. तसेच त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता होती. 


भाजपनेही या निवडणुकीत चांगलाच जोर लावला आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे