बारामती । अवैध दारू विक्री, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Sun, 30 Sep 2018-4:00 pm,

बारामती तालुक्यातील पिपळी गावात अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली. दारूचे 3000 हजार लिटर रसायन आणि साहित्य आग लावून नष्ट करण्यात आले. बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शोभा लांडगेंनी ही कारवाई केली. झारगडवाडी गावांमध्ये ज्याठिकाणी अवैध दारु विक्री चालू आहे. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, कुठेच काही सापडलं नाही. त्यावेळी जवळच असलेल्या पिपळी गावाकडे त्यांनी मोर्चा वळवला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link