पुणे । चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला टोला
सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने विश्वासघात केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र मध्यावधी निवडणूक झाली तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे समजेल, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.