मुंबई । `नाणार` आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Mon, 02 Dec 2019-11:50 pm,
'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.