शिर्डी । साईबाबांच्या जीवनावरील प्रसंग, जुन्या शिर्डीची प्रतिकृती
Wed, 17 Oct 2018-8:35 pm,
साईबाबा समाधी शताब्दीच्या निमित्तानं यंदा शिर्डीत भाविकांची रीघ लागलीय. समाधीचं शताब्दी वर्ष असल्यानं संस्थानच्यावतीनं भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज सकाळी बाबांच्या काकड आरतीने सोहळा सुरू झालाय. लक्ष लक्ष दिव्यांनी शिर्डी उजळून निघालीय. शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला आलेले भाविक साई समाधी मंदिर, व्दारकामाई, चावडी,गुरूस्थान या बाबांच वास्तव्य असलेल्या या ठिकाणांचं भक्तीभावानं दर्शन घेतात. शिर्डीत साईबाबांचं सगळ्यात पहिल्यांदा दर्शन झालं ते खंडोबा मंदिरात.