चाकण हिंसाचार: पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुरु, रात्रभरात २३ जण ताब्यात
नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते.
पुणे: सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान सोमवारी चाकणमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पोलिसांनी ही कारवाई सुरु केली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल २३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांची नावे पोलिसांकडून गुप्त राखण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नवी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. या पार्श्वभूमीवर या आंदोलनात समाजविघातक शक्तींनी शिरकाव केल्याची भीती काही नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांकडून या आंदोलनावर करडी नजर ठेवली जात आहे.