VIDEO : नाद करा पण पुणेकरांचा कुठं... तब्बल 25 किलो सोनं घालून पुणेकर जोडपं तिरुमलाच्या दर्शनाला
Viral Video : नाद करायचा नाय अशी एक मराठीत म्हणे आहे. ही म्हण पुणेकरांना कायम लागू होते. पुण्यातील एका कुटुंबाने तर अख्या देशाच लक्ष वेधून घेतलंय. 25 किलो सोनं अन् सोन्याचा मुलामा असलेली कार घेऊन हे थेट पोहोचले तिरुमलाच्या दर्शनाला
Pune Couple Visit Tirumala Wearing 25 kg of Gold : सोनं कितीही महाग झालं तरीही सोनं घेण्याचा आणि घालण्याचा मोह कमी होत नाही. नुकताच सोशल मीडियावर एक कपलची जोरदार चर्चा सुरु आहे. नवरा बायको, एक लहान चिमुकल्यासह एक व्यक्ती असे सगळे वरपासून खालपर्यंत सोन्यातून न्हावून निघाले होते.
पुण्यातील हे कुटुंब 12, 15 नाही तर तब्बल 25 किलो सोनं घालून तिरुमला मंदिरात दर्शनासाठी आले होते. एवढंच नाही तर 'गोल्डन गाईज' नाव लिहिली सोन्याचा मुलामा असलेली कारमध्ये हे आले होते. मिळालेल्या माहितीनुसार सनी नाना वाघकौरी, संजय दत्तात्रय गुजर आणि प्रीती सोनी असं या लोकांची नावं आहेत.
पुरुषांनी प्रत्येकी 10 किलो सोनं घातलं होतं आणि तर महिलेने 5 किलो वजनाची सोन्याची साडी आणि दागिनी घेतले होते. याची किंमत अहवालानुसार 15 कोटी रुपयांच्या घरात आहे. हे पुण्यातील कपल आपल्यासोबत बॉडीगार्ड आणि पोलीस घेऊन मंदिर परिसरात आली होती.
अनेक सोन्याच्या साखळ्या, सोन्याचा चष्मा, बांगड्या, हार, सात नंबरची सोन्याची चेन आणि अनेक दागिनं घालेली ही मंडळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. तिरुमलामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होता. ज्यामध्ये पुण्यातील या कुटुंबाने भक्ती आणि श्रद्धा दाखविण्यासाठी हा थाट केला.
तिरुपतीमधील श्री व्यंकटेश्वर मंदिर वर्षभर भक्तांकडून सोन्याचा प्रसाद स्वीकारतो. सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू भेटवस्तू देणे ही इथे एक सामान्य परंपरा मानली जाते. जी आदर आणि श्रद्धेचे प्रतीक मानली आहे. अशा भव्य प्रदर्शनांमुळे भारतीय धार्मिक परंपरांमध्ये सोन्याच्या महत्त्वावर विशेष जोर दिला जातो. बॉलिवूडमधील कपल असो किंवा उद्योगपती हे मोठ्या प्रमाणात तिरुमलला दर्शनासाठी येतात. नुकतीच श्रीदेवीची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या बॉयफ्रेंडसोबत तिरुमलला आली होती.