आळंदी: विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसे कुणाला वाटत असेल तर त्यांना वारकरी संपद्रायाचा विचारच समजला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ते शनिवारी आळंदीतील जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी वारकरी परिषदेच्या वक्ते महाराज यांनी शरद पवार हे हिंदू धर्मविरोधी असल्याचे सांगत वारकरी समाजाने त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नये, असे आवाहन केले होते. शरद पवार रामायणाला विरोध करतात. नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात, असेही वारकरी परिषदेच्या पत्रकात म्हटले होते.


मानलं बुवा! शरद पवारांचं विमानातून प्रवाशाला 'चाकण दर्शन'


या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला खडे बोल सुनावले. विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला, माऊलींच्या दर्शनाला आळंदीला तर तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अन त्यामुळे कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. त्यामुळे मी अशा गोष्टींकडे फारसा लक्ष देत नाही. लहानसहान गोष्टी सुरु असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे असते, असे पवार यांनी म्हटले. 


होय, शरद पवार जाणता राजाच; आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार


तसेच मी आळंदीमध्ये कुठलाही हेतू मनात ठेवून आलेलो नाही. एरवीही मी पंढरपूर , देहू, आळंदीला, तुळजापूर आणि शेगावला जात असतो. त्यावेळी प्रदर्शन करणे हा माझा हेतू नसतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.