मुंबई: शरद पवार यांना तळहातावरच्या रेषांप्रमाणे महाराष्ट्राचा भुगोल तोंडपाठ असल्याचे अनेकदा बोलले जाते. मात्र, शुक्रवारी दिल्ली-पुणे विमानप्रवासादरम्यान एका प्रवाशाला हे सगळे 'याचि देहा याचि डोळा' अनुभवता आले. सारंग जाधव असे या तरूणाचे नाव असून त्याने चित्रित केलेला व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
होय, शरद पवार जाणता राजाच; आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार
सारंग जाधव हा परभणीच्या महिराळ येथे राहणार आहे. तो काही दिवसांपूर्वी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासोबत दिल्लीला गेला होता. शुक्रवारी दिल्लीहून परतत असताना विमानतळावर शरद पवार आणि संजय जाधव यांची भेट झाली. त्यावेळी सारंगने शरद पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा संजय जाधव यांनी विमानात तुला शरद पवार यांच्याच बाजूला बसायला मिळेल, असे सांगितले. त्यामुळे सारंग चांगलाच हरखून गेला.
साताऱ्यात भर पावसात शरद पवारांची सभा
या संपूर्ण प्रवासात शरद पवार यांनी आपल्या पदाचा कोणतेही मोठेपणा न बाळगता सारंगसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शरद पवार यांनी सारंगचे कुटुंब, शेती, शिक्षण अशा गोष्टींची विचारपूस केली. यादरम्यान विमान पुण्याच्या जवळ आले. यावेळी शरद पवार यांनी सारंगला खिडकीतून दिसणाऱ्या चाकण परिसराविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. विमानातून दिसणाऱ्या प्रत्येक भागाची खडानखडा माहिती ते सारंगला देत होते. चाकण, तिथले उद्योग, जमिनींचा प्रश्न, शेतकरी असे सगळे समाजकारण पवारांनी त्याला समाजावून सांगितले. सारंगने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला आहे.