मुंबई : सकाळी लवकर आणि भरपूर नाश्ता करणे,  या नाश्त्यात दूध, दही, पनीर, अंडी, ओट्स, ड्रायफ्रूट्स असे पदार्थ असलेच पाहिजेत. नसतील तर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढायला लागते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोड आलेलं धान्य नाश्त्यात असावं


काही खाद्यपदार्थांमध्ये भरपूर फायबर असते. ते शरीरासाठी खूप उपयोगी ठरते. सकाळच्या नाश्त्यात असे फायबरयुक्त खाद्यपदार्थ खायला हवेत. पण नाश्त्यात प्राऊटसारखे फायबरयुक्त पदार्थ भरपूर खाल्ले नाहीत तर जादा चरबी बर्न होऊ शकत नाही. मग लठ्ठपणा वाढतो.


एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या


दररोज सकाळी उठल्यावर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायला हवे. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. पण हे कोमट पाणी प्यायले नाही तर शरीरातून टॉक्सिन्स बाहेर निघून जाऊ शकत नाहीत. मग पचनक्रिया धीमी होते आणि वजन वाढू लागते.


सकाळचा नाश्ता वेळेवर करा


सकाळचा नाश्ता वेळेवर करा. नाहीतर चयापचय क्रिया मंदावते. यामुळे चरबी योग्य प्रकारे बर्न होऊ शकत नाही. परिणामी वजन वाढते.


दररोज ठरलेल्या वेळी उठले पाहिजे


रात्री कितीही वाजता थकून भागून झोपलात तरी दररोज ठरलेल्या वेळी उठले पाहिजे. त्यातूनही दररोज रात्रीची झोप किमान ७ तास झालीच पाहिजे. ती जर झाली नाहीतर वजन वाढविणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि वजन वाढायला लागते.


कमीत कमी १५ मिनिटं व्यायाम असावा


सकाळी व्यायाम महत्वाचा आहे. तुमचं वय ३० च्या आत असेल तर रनिंग आणि त्यावर असेल तर जॉगींग किंवा वेगाने मैदानात चालले पाहिजे. किमान १५ मिनिटं.


शरीराला पुरेशी शक्ती, ताकद या व्यायामातूनच मिळत असते. पण हाच व्यायाम नियमितपणे केला नाही तर पचनक्रिया मंदावते आणि अशा स्थितीत वजन वाढायला लागते.