Vaginal pain: `या` कारणांनी अचानक योनीमार्गात होऊ शकतात वेदना; वेळीच तज्ज्ञांचा घ्या सल्ला
Vaginal pain: स्त्रिया अनेकदा या वेदनाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. योनीमार्गाच्या दुखण्यामागे अनेक गंभीर कारणं आहेत. ज्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे त्रास होऊ शकतो.
Vaginal pain: अनेकदा महिलांना योनीमार्गात वेदना होण्याची समस्या अधिक जाणवते. दीर्घकाळ बसणं, अधिक शारीरिक हालचाल होणं, लैंगिक संबंधांनंतर काही महिलांना योनीमार्गात वेदना होण्याची समस्या जाणवते. मात्र याचं कोणतेही निश्चित असं कारण नाही. वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये योनिमार्गातील वेदना वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकतात. स्त्रिया अनेकदा या वेदनाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. योनीमार्गाच्या दुखण्यामागे अनेक गंभीर कारणं आहेत. ज्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे त्रास होऊ शकतो.
मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल कुमटा यांच्या सांगण्यानुसार, योनिमार्गात वेदना होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे योनीमार्गाचा संसर्ग. हे यीस्ट संसर्ग, जिवाणू संसर्ग, ट्रायकोमोनास संसर्ग किंवा मिश्र संक्रमण असू शकते. रंगीत योनीतून स्त्राव, पांढरा, हिरवा किंवा पिवळा स्त्राव ज्याला दुर्गंधी असते, योनीमार्गाचा संसर्ग दर्शवतो. याशिवाय युरीनरी ट्रॅक इन्फेक्शनमुळे योनिमार्गात वेदना होऊ शकतात.
डॉ. कुमटा पुढे म्हणाल्या की, योनिमार्गात काही दुखापत झाली असेल तर त्यामुळे देखील वेदना होऊ शकतात. Dyspareunia किंवा वेदनादायक संभोगामुळे देखील योनिमार्गात वेदना होऊ शकते. खोल योनिमार्गात वेदना खोलवर एंडोमेट्रिओसिसमुळे होऊ शकतात. जर तुम्हाला योनिमार्गात काही वेदना होत असतील, तर तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या आणि योनिमार्गाची तपासणी करून घ्या म्हणजे ते कशामुळे होत आहे हे शोधू शकतील.
या कारणांमुळे योनीमार्गात वेदना होऊ शकतात
vulvar सिस्ट
vulvar सिस्ट हा एक प्रकारचा संसर्ग आहे ज्यामुळे महिलांना अनेकदा समस्या निर्माण होतात. जेव्हा तुमच्या योनीतील बार्थोलिन ग्रंथी द्रवपदार्थाने अवरोधित होतात, तेव्हा एक सिस्ट तयार होते. जर बार्थोलिन सिस्टचा आकार मोठा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. vulvar सिस्ट हे योनीमार्गातील वेदनांचे सर्वात सामान्य कारण आहे.
सेक्सुअली ट्रांसमिटेड इनफेक्शन
सेक्सुअली ट्रांसमिटेड इनफेक्शन हे योनिमार्गातील वेदनांचं एक सामान्य कारण मानलं जातं. या व्यतिरिक्त, इतर अनेक प्रकारचे इन्फेक्शन आहेत जसं की, UTI आणि यीस्ट संसर्ग ज्यामुळे वेदना आणि जळजळ होऊ शकते. STI ला कारणीभूत असलेले जीवाणू जीवघेणे असू शकतात आणि शरीरावर गंभीर परिणाम करतात.
संभोगादरम्यान अतिउत्साह
योनिमार्गात वेदना वेदनादायक संभोगाचा परिणाम असू शकते. प्युबिर रिजनमध्ये लैंगिक संबंधापूर्वी, दरम्यान किंवा नंतर वेदना होणं वैद्यकीयदृष्ट्या डिस्पेरेनिया म्हणून ओळखलं जातं. डीप डिस्पेर्युनिया म्हणजे योनीमध्ये खोल प्रमाणात वेदना होणं.
मसिक पाळी
पोटदुखीसोबत, योनिमार्गात क्रॅम्प्स येणं अनेकदा मासिक पाळीच्या दरम्यान अनुभवतात. सर्व महिलांना हा अनुभव येत नाही, जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान योनीमध्ये वेदना होत असेल तर हे त्यामागील कारण असू शकतं.